आयपीएल 2026 ची दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. प्रत्येक दिवशी चाहत्यांना चांगल्या सामन्यांची मेजवानी मिळत आहे. सगळ्या संघांचा पहिला सामना खेळून झाला आहे, पण काही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील दोन संघ कोलकाता आणि हैदराबाद आहेत. केकेआरने पहिला सामना मुंबईविरुद्ध, तर एसआरएचने बंगळुरूविरुद्ध गमावला. आयपीएलचा सहावा सामना या दोन संघांमध्ये होणार आहे.
आयपीएलचा सहावा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानात होणार आहे. केकेआरला या सामन्यात Home Advantage आहे, त्याचा फायदा केकेआर घेऊ शकते का? हे नक्कीच बघण्यायोग्य असेल. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केकेआरने उत्कृष्ट फलंदाजी केली, अजिंक्य रहाणे, फिन ऍलन आणि रघुवंशी यांनी आक्रमक फलंदाजी केली. पण, कोलकाताची गोलंदाजी त्यांच्या फलंदाजांच्या तुलनेत दुबळी वाटली. केकेआरची गोलंदाजी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांच्यावर अवलंबून आहे, पण पहिल्या सामन्यात दोघांचाही खेळ फिका वाटला.
गेल्या काही वर्षांत केकेआरच्या यशामध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. या हंगामातदेखील या दोघांना जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घ्यावी लागेल, असं दिसतंय. ब्लेसिंग मुजरबानी आणि कार्तिक त्यागी यांनी गोलंदाजी चांगली केली, मात्र त्यांनी प्रचंड धावा दिल्या. कार्तिक त्यागीकडून केकेआरला चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल, हर्षित राणाच्या अनुपस्थित केकेआरसाठी त्याची उपस्थिती मोलाची ठरते, कारण दोघेही एकाच प्रकारचे गोलंदाज आहेत. जर गोलंदाजी आणि फलंदाजीचा ताळमेळ बसला तर कोलकाता इतर संघांसाठी धोकादायक ठरू शकते.
दुसरीकडे हैदराबादकडे 'ब्लॉकबस्टर' फलंदाज आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिअस हेड, कर्णधार ईशान किशन, हेन्री क्लासेन आणि युवा फलंदाज अनिकेत वर्मा यांचं एकाच संघात असणं म्हणजे चौकार आणि षटकारांची बरसात होणार असा अंदाज सर्व बांधत आहेत. हैदराबादकडे चांगल्या गोलंदाजांचा तुटवडा आहे असंही म्हटलं जात आहे. सामाजिक माध्यमांवर हैदराबादच्या गोलंदाजीची तुलना रणजीच्या संघांबरोबर केली जात आहे. त्या टीकेला ते त्यांच्या चांगल्या कामगिरीने ते प्रत्युत्तर देऊ शकतात का ? यांच्याकडे सर्वांचाच लक्ष लागले आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या ईशान किशनवर तिहेरी जबाबदारी आहे. त्याला फलंदाजी तसेच यष्टिरक्षणदेखील करावं लागणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला संघाला एकत्र घेऊन चालायचं पण संघाकडून चांगली कामगिरी करून घ्यायची आहे. ईशान किशन स्पॉटलाईटमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा – LSG vs DC : पहिलाच सामना हातातून गेला! संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतला झापलं; मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
हायलाईट्स
खेळपट्टी आणि परिस्थिती –